विंदा - पुरस्कारांच्या पलिकडचे श्रेय मिळवणारा प्रतिभावंत
इतरांना जे करता येते, ते इतर करत असतातच, पण आपल्या स्वतःला जे येते, तेच फक्त स्वतः करावे आणि इतर जे करतात, ते आपल्यालाही करता येईल का, या संमोहनात न पडता अखंडपणे आपल्याच धुंदीत वाट चालत, निरनिराळी आव्हाने घेत, आशा-निराशेची पर्वा न करता ‘श्रेया’च्या शोधात चालत राहणारे आणि आश्चर्य म्हणजे ते श्रेय चक्क मिळवणारे कविवर्य विंदा करंदीकर म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष २३ ऑगस्टपासून सुरू होत आहे.......